Breaking News

भोकर नदीपात्रात अवैध वाळूची वाहतूक; ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त


जळगाव - जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील भोकर नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक केली जाते. अनेकवेळा याबाबत तक्रारीही केल्या जातात. मात्र तात्पुरत्या स्वरूपात कारवाईनंतर ही वाहतूक सुरू केली जाते. मात्र आज, सकाळी येथून वाळूची ट्रॅक्टरसह ट्रॉली तलाठ्यांनी जप्त केली. सकाळी ही वाळू अवैधरीत्या नदीपात्रातून वाहतूक होत असताना रावेर तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी हर्षल पाटील, तलाठी एम.ई.तायडे यांनी वाहन दंडात्मक क ारवाईसाठी ताब्यात घेतली.येथील तहसील कार्यालयात आणले.