Breaking News

संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी


पाथर्डी/प्रतिनिधी/- संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाथर्डी तालुका संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सव समिती यांच्या वतीने ३१ जानेवारी२०१८ रोजी शहरातील एडके कॉलनी येथे सकाळी मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. संत शिरोमणी रविदास महाराजांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. तर आलेल्या भाविकांसाठी अशोक सातपुते व संगीता सातपुते यांनी महप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुभाष भागवत व तालुकाध्यक्ष रोहिदास एडके यांनी केले होते. यावेळी रत्नमाला उदमले, पिटु एडके, रामदास सोनवणे, देवेंद्र आंबेटकर, अशोकराव उदमले, सागर तरटे, अवि पाचारणे, गौरव एडके, सुनिता एडके व मोठ्या संख्येने संजबांधव उपस्थित होते.