संजय कोठारी समाजभुषण पुरस्काराने सम्मानित
जामखेड/ ता.प्रतिनिधी/ - जामखेड तालुक्यासह परिसरात गेली पंचवीस वर्षापासुन समाजसेवा करत असलेले सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य जैन कॉन्फरन्स दिल्लीचे सदस्य संजय कोठारी यांना संविधान महोत्सव या कार्यक्रमात भिमसैनिक च्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे
संजय कोठारी हे गेली पंचवीस वर्षापासुन तालुक्यात कोठेही आपघात झाल्यास,अपघातातील जखंमीना स्वता: रुग्णवाहिका घेऊन जातात रुग्णांना वाचवतात , दलित समाजातील व्यक्तींना नेहमीच मदत करतात. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाणपोया, शिवाय जनावरांसाठी (गाढवांसाठी) पिण्याच्या पाण्याचे हौदठेवले आहे.
गोरगरिबांना केवळ दोन रुपयात जेवन गेली बारा वर्षा पासुन पंढरपुर कडे जाणाऱ्या दिंडीचे स्वागत करुन व्यवस्था करतात. दिनदुबळ्यांना सतत मदत ,राञी बसस्टँन्ड वरील गरिबाना, प्रवाश्यांना स्वेटरचे वाटप,अंतरवाली येथील वृध्दाश्रमातील वृध्दांना स्वेटर वाटप गुणवंत विद्यार्थी सत्कार, गरजु विद्यार्थीना गणवेश वाटप, वह्यापुस्तक वाटप,दिवाळी निमित्य कैद्यांना मिठाई वाटप, बेवारस मृतदेहांची व ज्याची आपल्या नातेवाईकांची अंत्यविधी करण्याची ऐपत नाही. अश्यांचे अंत्यविधी स्वखर्चाने करतात, आदर्श शिक्षकांचा गौरव, समाजसेवी सिंधुताई सपकाळ व डॉ. अपर्णा ताई रामतिर्थकर यांचे व्याख्यान ठेवुन समाजप्रबोधन करने, केवळ एक दिवसाचे झालेले अर्भक बेवारसपणे टाकुन दिलेले दोन पुरुष जातीचे व एक स्ञी जातीचे अर्भक आणून अहमदनगर येथील स्नेहांकुर स्नेहालयात स्वाधीन केले. स्नेहालयाच्या मदतीने इटली, मुंबई, अश्या ठिकाणी दत्तक देण्यात आले, मुकबधीर महिलेवर अत्याचार झाल्याने ती गरोदर झाली असता तिची प्रसूती करणे. तसेच लग्न जमविणे वृक्षारोपन करने, रक्तदान शिबीरे, सर्वरोग निदान शिबीरे,महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, असे अनेक सामाजिक कार्य केल्या बद्दल जामखेड तालुक्यातील संपूर्ण भीम समाजाकडुन संजय कोठारी यांना सन्मानपञ व सन्मानचिन्ह देवुन संविधान महोत्सव कार्यक्रमात गौरविण्यात आले आहे.
संजय कोठारी हे गेली पंचवीस वर्षापासुन तालुक्यात कोठेही आपघात झाल्यास,अपघातातील जखंमीना स्वता: रुग्णवाहिका घेऊन जातात रुग्णांना वाचवतात , दलित समाजातील व्यक्तींना नेहमीच मदत करतात. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाणपोया, शिवाय जनावरांसाठी (गाढवांसाठी) पिण्याच्या पाण्याचे हौदठेवले आहे.
