Breaking News

हल्लाबोल आंदोलनाची भाजप सरकारने घेतली धास्ती: माजी आ. पांडुरंग अभंग


नेवासा /श.प्रतिनिधी /- केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार हे केवळ गप्पा मारणारे सरकार आहे. शेतकऱ्यांना बरबाद करणाऱ्या या सरकारचे भांडाफोड करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभर सुरू असलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा भाजप सरकारने धास्ती घेतली असल्याची टीका माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केली.
गुरुवार , दि.15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शेवगाव येथे अजितदादा पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंढे यांचे उपस्थितीत होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी आयोजित नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या नेवासा येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना माजी आ. अभंग बोलत होते. 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील बैठकीचे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले, कार्याध्यक्ष दादा गंडाळ, तुकाराम मिसाळ,ज्ञानदेव लोखंडे, अशोकराव मिसाळ,राजेंद्र मते,डॉ अशोकराव ढगे व्यासपीठावर उपस्थित होते.