Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत लँपटॉप देणार : विखे


आश्वी : प्रतिनिधी :- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील भविष्यातील पिढी सर्वगुण संपन्न घडवणे गरजेचे आहे. त्यासाठी माहिती, तत्रंज्ञान, जागतिक घडामोडी, शेतीविषयी नवनवीन शोध व माहिती शालेय स्तरांवराच मुलांना उपलब्ध होणे गरजे आहे. त्यातून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. विद्यार्थ्यांना आधुनिक जगाशी जोडण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील दहावीच्या वर्गात शिक्षण घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत लँपटॉप देणार आहे, असे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी केले आहे.
संगमनेर तालूक्यातील पिप्री- लौकी आजमपूर येथे आयोजित विविध विकासकामांचे उदघाटन आणि विद्यालयाच्या रौप्य महोत्सवात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अलका गिते होत्या. याप्रसंगी पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, जिल्हापरिषद सदस्या रोहिणी निघुते, पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे, भाऊसाहेब विखे, भगवानराव ईलग, भारत घोगरे, संपतराव सांगळे, गंगाधर आंधळे, रमेश गिते, भिमराज राहिंज, नाथा लावरे, भाऊसाहेब मुढे, भारतराव गिते, प्रा. कान्हु गिते, प्रातांधिकारी भागवत डोईफोडे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, रंगनाथ आंधळे, उपसरपंच दिनकर आंधळे, प्राचार्य भाऊसाहेब गाढे आदी उपस्थित होते. याप्रसंगी ८१ लाख ८५ हजार रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन विखे पाटील यांच्या हस्ते पार पडली.

विखे म्हणाले, गरीब, दलित व आदिवासींना मिळणा-या मुलभूत सेवा सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थानी व कार्यकर्त्यानी गावो-गावी सभामंडप बांधण्याऐवजी गावातील शिक्षणाच्या मुलभूत गरजा पूर्ण कराव्यात. भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी डिजिटल क्लासरुम, प्रोजेक्टर आदी सुविधा उपलब्ध करुन देतांना विद्यार्थ्यांमध्ये भविष्यातील आव्हानांबाबत जनजागृती करावी लागणार आहे.