Breaking News

गुडमॉर्निंग पथकाची आढळगावात कारवाई


श्रीगोंदा/प्रतिनिधी/- श्रीगोंदा तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी अधिकारी व पंचायत समिती पदाधिकारी यांनी चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. याच निमित्ताने आढळगाव येथे भल्या पहाटे पंचायत समितीचे अधिकारी व पोलीस यंत्रणा यांचे संयुक्त पथकाने उघड्यावर शौचास जाणाऱ्या १८ व्यक्तींवर कारवाई केली आहे. 
हागणदारी मुक्तीच्या बाबतीत आढळगावचा शेवटचा क्रमांक लागतो. त्यामुळे हे गाव लवकरात लवकर हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वतः पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम लगड यांनी घरोघरी जाऊन शौचालयाचे महत्व पटवून दिले होते, तरी सुद्धा अजूनही काही बहाद्दर उघड्यावर प्रातविर्धी करण्यास धन्यता मानत आहेत. त्यामुळे आढळगावचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी वाहुरवाघ यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आण्णासाहेब गहिरे ,कृषी विभागाचे एस. आर. वाकचौरे , संजय चौरे , ग्रामसेवक दराडे , निंभोरे , ग्रामसेविका गायकवाड आदींच्या पथकाच्या मदतीने आढळगाव मध्ये गुडमॉर्निंग पथकाने कारवाई केली. यावेळी या कारवाईत पोलीस यंत्रणेने पंचायत समितीच्या पथकाला मदत केली. त्यामुळे १८ जणांवर या पथकाने कारवाई केली आहे. जे उघड्यावर प्रातविधी साठी जाताना सापडले. त्यांना ग्रामविकास अधिकारी शिवाजी वाहुरवाघ यांनी नोटीस बजावून समज दिली.