नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना झालेली धक्काबुक्की तसेच मारहाणीप्रकरणी प्रमुख आरोपी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी बुधवारी दिल्लीच्या जामिया पोलीस स्थानकात आत्मसमर्पण केले. दिल्ली पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी याप्रकरणी आपचे आणखीन एक आमदार प्रकाश जारवाल यांना अगोदरच अटक केली आहे. दिल्लीतील न्यायालयाने दोन्ही आमदारांना गुरुवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आत्मसमर्पण करण्याअगोदर खान यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही काहीच चुकीचे केलेले नाही. मुख्य सचिव भाजपच्या इशाऱयावर काम करत असल्याचा दावा खान यांनी केला.
आप आमदारांना न्यायालयीन कोठडी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:52
Rating: 5