Breaking News

खूनप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर


चहाची टपरी चालविण्यावरुन झालेला वाद आणि त्या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन बळीराम थोरात याचा खून करण्यात आला. आरोपी सोन्याबापू कोळपे याने मयत थोरात याला मारहाण केली होती. या दोघांमध्ये दि. २८ जुलै २०१७ रोजी वाद झाले होते. दरम्यान, याप्रकरणी आरोपीने अँड. शिवराज कडू यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी औरंगाबाद खंडपीठामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. सदरचा अर्जावर सुनावनी होऊन आरोपीस तालुका पोलीस स्टेशनला नियमित हजर होण्याच्या अति आणि शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला. या घटनेत मयत बळीराम थोरात याचा डोक्याला गंभीर जखम कोपरगाव येथील सरकारी रूग्णालयात मृत्यू झाला.