Breaking News

मराठी भाषा गौरव दिन साजरा करणे कौतुकास्पद


पाथर्डी / प्रतिनिधी /- मराठी भाषा गौरव दिन साजरा करणे कौतुकास्पद असल्याचे मत नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी व्यक्त केले. शासनाच्या परिपत्रकानुसार पाथर्डी बस आगाराने मराठी भाषा गौरव दिन साजरा केल्याबद्दल ते बोलत होते. यंदा प्रथमच शासन आदेशानुसार मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यासोबतच २७ फेब्रुवारी ते ५ मार्च असा वाचन सप्ताह पाथर्डी बस स्थानकामध्ये आयोजित करण्यात आला असून 'ब्रिक्स' आणि 'क्रिस्टल' या औद्योगिक संस्थांच्या माध्यमातून शासनाकडून पाथर्डी बस आगाराला प्राप्त झालेल्या स्वच्छता यंत्राच अनावरण यावेळी करण्यात आले. वाचन सप्ताहासाठी पुस्तक विक्रेते जोशी यांचे मोलाचे सहकार्य आगाराला लाभले असून त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी नगरसेवक प्रसाद आव्हाड, माजी नगरसेवक दीपक देशमुख, धनंजय थोरात, आगार व्यवस्थापक तरवडे, आगाराचे राजगुरु, शेख, अरविंद सोनटक्के यासह अधिकारी- कर्मचारी वर्गासह प्रवासी उपस्थित होते