Breaking News

श्रीमधमेश्वर मंदिरात गर्दी

श्रीमधमेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पीर योगी लक्ष्मणनाथजी व विष्णू नवसे यांचे हस्ते पुजन करण्यात आले. शिवाजी नगर येथुन ध्वज मिरवणुक काढण्यात आली. 


या मिरवणुकीत कृष्णा परदेशी, गणेश कोरेकर, महेश गरुटे, अमोल जोंधळे, कृष्णा भांड, कचरू राजगिरे, पप्पू तट्टु आदी सहभागी झाले होते. विनोद कराडे, विलास जिरे, नंदकुमार यादव, बाळासाहेब साप्ते, देविदास साळुंके, किशोर सुरडे आदींनी खिचडी प्रसादाचे वाटप केले. गोकर्णेश्वर मंदिरामध्ये निशांत साबरे, किशोर पठाडे, विजय शिंदे, हरिष पोतदार, शंतनू देशमुख, प्रशांत साबरे, सार्थक परदेशी, अक्षय करंडे, संतोष कांगोणे, अनिकेत मोरे, मंगेश गोसावी यांनी खिचडी प्रसादाचे वाटप केले. पावन गणपती मंदिर प्रांगणातील महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या महादेव मंदिरात प्राचीन पिंड आहे व आकर्षक नंदीची मूर्ती आहे.

महाशिवरात्रीनिमित्त आज पहाटे अँड. के. एच. वाखुरे व आशा वाखुरे या दाम्पत्याने अभिषेक करून विधिवत पूजा केली. श्री स्वामी समर्थ सेवेकरी महिलांनी सामूहिक आरती केली. त्यानंतर मंदिरावर झेंडा चढवण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवरानदी तीरावरील या शिवालयामध्ये दर्शनसाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.