संगमनेर/प्रतिनिधी :- नवीन घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आणावेत, यासाठी सासरच्यांकडून होत असलेल्या मारहाणीला कंटाळून येथील ३० वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केली. तालुक्यातील पारेगाव गडाख याठिकाणी ही घटना घडली. उषा संतोष गडाख असे मयत विवाहितेची नाव आहे. यासंदर्भात महिलेचा भाऊ विठ्ठल साहेबराव घोटेकर {रा. घोटेकरवाडी ता. सिन्नर जि. नाशिक} याने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली. या महिलेचा पती संतोष शिवाजी गडाख {रा. पारेगाव गडाख ता. संगमनेर} याने त्याची पत्नी मयत उषाने माहेरहून ४ लाख रुपये हुंडा आणण्याची मागणी करत मारहाण केली. या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.
सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या
Reviewed by Dainik Lokmanthan
on
22:23
Rating: 5