Breaking News

हडपसर येथे गॅरेजला लागलेल्या आगीत सामान जळून खाक


पुणे, दि. 03, फेब्रुवारी - हडपसर येथील रामटेकडी चौकालगत असलेल्या गॅरेजचे सामान ठेवलेल्या पत्र्याच्या खोलीला आज सकाळी साडेसहा वाजता आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. या आगीत गॅरेजमधील सर्व सामान जळून खाक झाले. 

आग एका टँकरच्या सहाय्याने विझवण्यात आली. सुदैवाने आगीत कुणीही जखमी झाले नाही. मात्र, आग कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. ही कामगिरी अग्निशामक दलाच्या शिवाजी चव्हाण, दत्ता चौधरी, सखाराम पवार, संपत चोरे, मारूती शेलार, नारायण जगताप यांनी बजावली.