Breaking News

केंद्रीय अर्थसंकल्पावरून सचिन सावंत यांची मोदी सरकारवर टीका

मुंबई, दि. 03, फेब्रुवारी - केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केलेली ‘आयुष्यमान भारत’ योजना म्हणजे मोदी सरकारचा अजून एक नवा ‘जुमला’ असल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.


या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, गेल्या चार वर्षातील सरकारने जाहीर केलेल्या प्रत्येक योजनेचे जनतेला सांगितलेले आकडे व प्रत्यक्षात झालेला खर्च पाहता मोदी सरकार गेल्या चार वर्षापासून सरकार चालवत आहे, की मस्करी करत आहे तेच देशातल्या जनतेला समजत नाही. गेल्या चार वर्षाचा कार्यकाळ हा जुमलेबाजी, अतिरंजित आकडे, फसव्या घोषणा, मोठमोठे इव्हेंट व जाहिरातबाजी असाच आहे. जुमलेबाजीच्या या साखळीमध्ये ‘आयुष्यमान भारत’ नावाची आणखी एक कडी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जोडली आहे. देशात 10 कोटी कुटुंबांना म्हणजेच 50 कोटी जनतेला 5 लाख रूपयांपर्यंत आरोग्य विमा देण्याची घोषणा या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे,असेही ते म्हणाले.