Breaking News

अखेर उक्कलगावात भरला आठवडे बाजार विक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


उक्कलगांव प्रतिनिधी ;- उक्कलगावच्या कृष्णार्पण संस्थेच्या संकल्पनेतूण आज {दि. २१} येथे आठवडे बाजाराला सुरुवात करण्यात आली. अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब थोरात यांच्या हस्ते या बाजारला प्रारंभ झाला. या पहिल्या वहिल्या बाजारला व्यावसायिक आणि ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
या नव्या बाजारला महिलांची प्रचंड गर्दी झाली. शेतक-यांच्या शेतमाला भाव मिळाला. पंचक्रोशीतील आणि गावालगतच्या शिवारातील शेतमाल या बाजारात विक्रीसाठी आणला गेला. भेळविक्रेत्याची जागा, भाजीपाला विक्रेत्यासाठी जागा, उपलब्ध करुन देण्यात आली. बेलापूर आठवडे बाजार हा तीन किलोमीटर होता. आणि गोरगरीब लोकांना यासाठी रिक्षा भाडे खर्च करुण जावे लागायचे. आता गावात बाजार भरत असल्यामुळे शेतक-यांसह ग्रामस्थांमध्ये या बाजारचे स्वागत होत आहे. उक्कलगावात आज बाजार भरणार असल्याचे सकाळापासूनच लोकांमध्ये उत्सुकता पहायला मिळाली. दुपारी चार वाजल्यानंतर बाजारात गदीॅ वाढली. या बाजारच्या माध्यमातून उक्कलगांवच्या ग्रापंचायतीला दर आठवड्याला महसूल मिळणार आहे. कृष्णार्पण संस्थेमार्फत भाजीपाला भाजीपाला देण्यात आला.

यावेळी सोपानराव जगधने, रामचंद्र थोरात, आबासाहेब थोरात, जर्नादन थोरात, नूतन संरपच नितीन थोरात, उपसंरपच शारदा जगधने, माजी अध्यक्ष सुनिल थोरात, नामदेव मोरे, ससाणे महाराज, उल्हास महाराज भगत, जगन्नाथ रजपूत, अॅड. राजाभाऊ थोरात, गुलाबराव गाडेकर, शिवाजी थोरात, भास्कर थोरात, जालिंदर थोरात, अनिल थोरात, रविंद्र थोरात, दिपक थोरात, पं. स. अभियंता विलास जगधने, पोपट थोरात, जगन्नाथ महाडिक, अण्णा थोरात, धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई, पत्रकार शरद थोरात, भरत थोरात आदींसह सर्वच ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. अनिल थोरात यांनी आभार मानले.