Breaking News

चंद्रपुरात दोन नक्षलवाद्यांना अटक


चंद्रपुर : बल्लारपूर रेल्वे स्थानकावर दोन नक्षलवाद्यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. रामन्ना व पद्मा असे या दोघांची नावे असून ते दोघे पती पत्नी असल्याचे समोर आले आहे. रामन्ना या नक्षलवाद्यावर 25 लाखांचे, तर पद्मावर 6 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. हे दोन्ही नक्षली लाहेरी पोलीस स्टेशनचे ‘वॉन्टेड’ आहेत. यामुळे त्यांना अटक केल्यानंतर त्वरीत गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. रामळण्णाचे दुसरे नाव ‘टेक रामण्णा’ असे असून त्याच्यावर नक्षलीचळवळीतील तंत्राविषयींची संपूर्ण जबाबदारी होती. गेली तीस वर्षे संबंधित दाम्पत्य नक्षलीमध्ये कार्यरत होते.