Breaking News

प्रभावी आपत्ती व्यवस्थापन हवे - राजेंद्र चव्हाण

पाथर्डी/ शहर प्रतिनिधी/- नैसर्गिक आपत्ती ही जगात कुठे ना कुठे तरी येतच असते. अशा नैसर्गिक आपत्ती पासून कोणताही देश मुक्त नाही. प्रश्न आहे तो अशा आपत्तीमध्ये कमीत कमी हानी होण्याची,त्यापासून दक्षता घेण्याची. अशी आपत्ती कोसळलीच तर कमीत कमी वेळेमध्ये तत्परतेने प्रभावी आपत्ती व्यवस्थापन आमलात यायला हवे. असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन तज्ञ राजेंद्र चव्हाण यांनी केले.

येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी पी ढाकणे, तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ एस बी चव्हाण, समन्वयक डॉ बबन चौरे, जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, प्रा दत्तप्रसाद पालवे उपस्थित होते.

यावेळी डॉ अमोल आव्हाड यांनी आपत्तीनंतर घ्यावयाच्या प्रथमोपचारा संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. डॉ तुपेरे यांनी शासकीय रुग्णवाहिकेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळी डॉ अजय पालवे, प्रा किरण गुलदगड, आदी प्राध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ बबन चौरे यांनी तर आभार डॉ अभिमन्यू ढोरमारे यांनी मानले-