Breaking News

50 कोटी गरीब जनतेसाठी आरोग्य विमा जाहीर


देशातील 10 कोटी कुटुंबांना अर्थात सरासरी 50 कोटी लोकांना प्रति वर्ष 5 लाखांचा आरोग्य विमा जाहीर करण्यात आला आहे. जगातल्या सगळ्या देशांमध्ये भारताने जाहीर केलेला हा सर्वाधिक आरोग्यविमा आहे असाही दावा अरूण जेटली यांनी केला आहे. राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा देशाच्या एकूण जनतेपैकी 40 टक्के लोकांना होणार आहे असेही अरूण जेटली यांनी म्हटले आहे. गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दरवर्षी 5 लाखांची आरोग्य मदत जाहीर केली आहे. जगातील ही सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचार मिळण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.