Breaking News

सोयाबीन भाव वाढीचा फायदा शेतकर्‍यांना मिळाला नाही : आ. बोंद्रे

चिखली : ग्रामीण भागातील जनतेसमोर स्वप्नाचा बाजार मांडून लोकांना आशेला लावायचे, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पदरात काहीच पडु दयायचे नाही, असे धोरण विद्यमान भाजपा सरकारने अवलंबीले आहे. शेतकर्यांची सोयाबीन बाजारात आली, त्यावेळेस ती मातीमोल भावाने विकायला शेतकर्यांना भाग पाडले, आणी आता शेतकर्यांची सोयाबीन संपल्यावर व्यापार्यांच्या फायदयासाठी सोयाबीनला भाव देण्याचे काम सुरू आहे. सोयाबीनच्या झालेल्या या भाव वाढीचा फायदा शेतकर्यांना तिळमात्रही मिळु शकला नाही, मात्र पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस याची प्रचंड दरवाढ करून सर्वसामान्यांना माहागाईच्या खाईत लोटण्याचे या सरकारने केले आहे. राज्यातील ग्रामपंचायतीसाठी कुठलाही निधी उपलब्ध करून देण्याचे काम या सरकारने मागिल तिन- साडेतीन वर्षात केले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासही खुटला आहे, तर शेतकरी सरकारच्या व्यापारी धार्जीन्या धोरणामुळे लुटल्या गेला आहे. असे उद्गार आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी ग्राम दिवठाणा येथील आमदार निधीतून नदी खोलीकरण व सभामंडपाचे भुमीपुजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले. 


चिखली मतदार संघातील दिवठाणा या गावी भगीरथ जलसंजीवनी प्रकल्पा अंतर्गत नदी खोलीकरण व रूदीकरणाच्या कामासाठी 8 लक्ष रूपये तर गावातील विविध सामाजिक कार्यकमासाठी सभामंडपाची उभारणी करायची म्हणून 7 लक्ष रूपये असे 15 लक्ष रूपये निधी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी दिवठाणा वासियांना उपलब्ध करून दिला. त्या कामाचे भुमीपुजन अ‍ॅड. विजयसिंग राजपुत यांचे अध्यक्षतेखलील आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या हस्ते संपन्न कार्यक्रमात करण्यात आले. शिवाय कॉगे्रस कमिटीचे दिवठाणा ग्रामशाखा व युवक कॉगे्रसची दिवठाणा शाखा उद्घाटनाचा कार्यक्रमही आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, उपसभापती ज्ञानेश्‍वर सुरूशे, युवक कॉगे्रस विधानसभा अध्यक्ष रमेश सुरडकर, बाजार समिती संचालक ईश्‍वर इंगळे, गजानन मोरे, रामदास मोरे, एस.के.मोरे, उत्रादा सरपंच रमेश इंगळे, आंधई सरपंच कृष्णा चौथे, हातणी सरपंच विष्णु जाधव, सवणा सरपंच पुरूषोत्तम हाडे, अजिम शेख, किशोर साळवे, बाळु साळोख, प्रल्हाद पाटील, भगवान गायकवाड, निवृत्ती इंगळे, डॉ. ए.एस.वसु, सरपंच सौ. कल्पना शिवदास मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
दिवठाणा येथे वरील कार्यक्रमा निमित्त आमदार राहुलभाउ बोंद्रे यांचे गावात आगमन झाले असता, त्यांची ढोलताशांच्या गजरात संपुर्ण गावातून मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान युवक कॉग्रेस शाखा व ग्रामशाखा उद्घाटन झाल्यावर ग्रामपंचायत समोर मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात विजयसिंग राजपुत, डॉ. सत्येंद्र भुसारी, डॉ. वसु, डॉ. विष्णु इंगळे, एस.के. मोरे, यांची समोयोचित भाषणे झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय इंगळे, प्रास्तावीक उपसरपंच विलास वसु, तर आभार प्रदर्शन शिवदास मोरे यांनी केले. कार्यक्रमासाठी सिताराम मोरे, शिवदास इंगळे, सौ. प्रतिभा सिताराम मोरे, सौ. निता किशोर मोरे, सौ. शिला परमेश्‍वर मोरे, कृष्णा मोरे, गजानन वसु, अबरसिंग मोरे, राजेंद्र इंगळे, रामेश्‍वर पवार, विठोबा वसु, एकनाथ मोरे, समाधान मोरे, विजय मोरे, सिध्देश्‍वर इंगळे, पंढरीनाथ इंगळे, विष्णु इंगळे, बळीराम मोरे, रामेश्‍वर मोरे, आनंथा मोरे, परमेश्‍वर मोरे, विनोद मोरे, दत्ता मोरे, सुरेश मोरे, राजु मोरे, रमेश सोळंकी, आत्माराम मोरे, शिवदास वसु, मोहनसिंग इंगळे, गजानन इंगळे, निवृत्ती इंगळे, सतिश मोर, मुरलीधर मोरे, बळीराम तवर, ईश्‍वर कबळीक, यांचेसह असंख्य गावकरी उपस्थित होते. यावेळी नेव्ही मध्ये निवड झालेल्या ज्ञानेश्‍वर विष्णु इंगळे याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.