Breaking News

पाकिस्तानकडूनच गोळीबार होतो का ? फारूख अब्दुल्लाचे वादग्रस्त वक्तव्य


पाकिस्तानच्या सीमेवर फक्त पाक सैन्याकडूनच गोळीबार होतो का ? दोन्हीकडून गोळीबार होतच असतो असे संतापजनक वक्तव्य नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी केले. ‘केवळ पाकिस्तानच गोळीबार करत आहे का? दोन्ही बाजूने गोळीबार होत आहे. अशी परिस्थिती लोकांसाठी घातक आहे. ही परिस्थिती युद्धात ढकलणारी आहे. युद्ध कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. केवळ चर्चेनंच प्रश्‍न सुटतो,’ असेही अब्दुल्ला म्हणाले.