राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत शिवतेज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्ण
पाथर्डी /श.प्रतिनिधी/- खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिवतेज विद्यालय व श्री क्षेत्र मढी गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवू शकतात. त्यासाठी खेळांच्या विविध प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे येण्याची गरज आहे. शासनस्तरावर अवलंबून न राहता गावातील सामाजिक व सार्वजनिक संस्थेने याबाबतच्या सर्वांगीण प्रोत्साहन देणाऱ्या सोयी सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन माजी सरपंच व जेष्ठ नेते भगवान मरकड यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेमध्ये पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील भैरवनाथ क्रीडा व समाजसेवा मंडळ अहमदनगर संचालित शिवतेज माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील रेवणनाथ अशोक मरकड, अनिल विजय मरकड, ओंकार कानिफ साळवे, या खेळाडू विद्यार्थ्यांनी धावण्याचे कोणतेही तंत्र आवगत नसताना कठोर मेहनत करून उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदके पटकावली. या विजेत्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने आयोजित गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच भगवानराव मरकड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ क्रीडा व समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष अशोकराव मुखेकर तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड, माजी उपसरपंच देविदास मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, ह.भ.प.बोधानंद महाराज, कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, सचिव सुधीर मरकड, नवनाथ मरकड, वी.वी.सेवा संस्थेचे चेअरमन सुखदेव मरकड, युवा नेते नवनाथ मरकड, विद्यालयाचे समन्वयक बाळासाहेब मरकड, जनार्धन मरकड, विष्णू मरकड. प्राचार्य गौतम ढेकणे, गणेश मरकड, दशरथ मरकड, विठ्ठल मरकड उपस्थित होते.