Breaking News

नाशकात जुनियर कॉलेज शिक्षकांचे जेलभरो आंदोलन

नाशिक, दि. 03, फेब्रुवारी - नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले होते.मात्र पोलिसांनी आंदोलककर्त्या सुमारे दोनशे शिक्षकांना ताब्यात घेत सोडून दिले. 


महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यलयीन शिक्षक संघाने यापूर्वी राज्यभरात तहसीलदार,जिल्हाधिकारी कार्यालय,शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले होते.मात्र शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने शुक्रवारी राज्यभरात संघातर्फे जेलभरो आंदोलन करण्यात आले.