Breaking News

एनएमसी बिलच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील दवाखाने 2 दिवस बंद राहणार


जळगाव, दि. 03, फेब्रुवारी - जळगाव जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्सच्यावतीने 5,6 फेब्रवारी रोजी दिल्ली येथील रामलीला मैदान येथे एनएमसी बिलच्या समर्थनार्थ ‘स्वा भिमान समर्थन रॅली काढण्यात येणार असून या दिवशी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ दोन दिवस दवाखाने बंद ठेवण्यात येणार आहे . जिल्हाभरातून होमिओपॅथी डॉक्टर्स यात सहभागी होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष डॉ. रितेश पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी केंद्रशासनाने डॉक्टरांच्या हिताचे एनएमसी बिल पारित केले असून त्याच्या समर्थनार्थ देशभरातून होमिओपॅथी डॉक्टरांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.