Breaking News

स्पर्धा निर्माण व्हावी माञ ती शेतकर्‍यांना मारक नको - ना. विखे

सहकाराच्या जिवावर जे मोठे झाले अशांना कोणाचा धाक न राहिल्याने सहकाराचा स्वाहाकार करत खाजगी कारखाने काढुण सहकार क्षेञाचा दबदबा कमी केला. स्पर्धा निर्माण व्हावी माञ ती शेतकर्‍यांना मारक नको. या पार्श्‍वभूमीवर गणेश भांड याच्यासारख्या युवकाने शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने केलेले काम ईतरांना प्रेरणादाई असल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे यांनी केले आहे.

तालुक्यातील देवळाली प्रवरा उद्योजक व चैतन्य उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष गणेश भांड यांचा अभिष्टचिंतन सोहळा राज्याचे विरोधीपक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि ठाणे येथिल ज्येष्ठ समाजसेवक व एन.के.टी. चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष. डॉ. नानजीभाई ठक्कर, मा. न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तर डॉ. तनपुरे कारखाण्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हा. चेअरमन शाम निमसे, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, महंत अरुणगिरी महाराज, महंत डॉ. ज्ञानेशानंद शास्ञी महाराज, पोलिस उपअधिक्षक अरुण जगताप, राहुरी पंचायत समितीच्या सभापती मनिषा ओहळ, सचिन गुजर, बीडचे शिवसेना नेते गणेश उगले, श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापती दिपक पटारे, उद्योजक बाबासाहेब चिडे, गोरक्षनाथ चव्हाण, शिवसेनेचेे तालुकाध्यक्ष विजय ढोकणे, तहसिलदार अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस निरीक्षक संपत शिंदे, उपनिरीक्षक अन्सार शेख, लक्ष्मण भोसले एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजी ढवळे, पुणे येथिल उद्योजक जितेंद्र बोरसे, सुरेंद्र कुमार कर्णीक,मानवअधिकार संघटनेचे अध्यक्ष विलास निर्मळ ,भाजप तालुकाध्यक्ष विक्रम तांबे यांच्या उपस्थितीत चैतन्य मिल्क अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो फार्म भांड वस्ती देवळाली प्रवरा येथे पार पडला. सकाळी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यात सुमारे एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी बोलतांना निवृत्त न्यायाधीश बी.जे .कोळसे पाटील यांनी सांगितले की, गणेश भांड सारखे सामाजिकता जपणारे उद्योजक निर्माण होणे ही काळाची गरज आहे .सामान्य माणसाच्या व शेतकर्‍यांचा गरजा ओळखुन ते समाज हिताची कामे करत आहेत. अनेक कुंटुंबाचा ते आधार बनले आहेत. 
यावेळी डॉ. नानजीभाई ठक्कर यांनी सांगितले की, सामान्य माणसात आपण देव शोधून त्यांना मदत करण्याची भुमिका ठेवली पाहिजे, ती खाशीयत गणेश भांड यांच्यात आहे. समाज्यासाठी जेवढे करता येईल तेवढे करा. यावेळी गरजु महिलांना शिलाई मशिनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच पञकारांना पाच लाखांचा विमा प्रदान करण्यात आला.