Breaking News

नागलवाडी परिसरात वाळू तस्करांवर कारवाई


कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत तालुक्याच्या सीमेवरून वाहणार्‍या सीना नदी पात्रात नागलवाडी येथे महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत दहा ट्रँक्टर रंगेहाथ पकडले.कर्जत तालुक्याच्या दक्षिणेतून भीमा तर उत्तरेतून सीना नदी वाहते, या दोन्ही नद्यामधून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असते, मात्र त्याकडे पोलिस व महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात. अधून मधून भीमा नदीतील वाळू उपशावर कारवाई केल्याचा दिखावा केला जातो, मात्र सीना नदी पात्रात मात्र अशी जुजबी कार्यवाही केलीच जात नसल्याने या पट्ट्यात जोरदार वाळू उपसा सुरू होता, मात्र आज महसूल व पोलीस यंत्रणा अचानक सक्रिय होऊन नागलवाडी येथे सुरू असलेल्या वाळूउपशावर थेट कारवाई केली. येथे वाळू भरत असताना 10 ट्रँक्टर सापडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले. वाहन धारक संदीप खेडकर, संजय गिरी, विकास कवळे, बारकु पांडुळे, प्रताप कवळे, धनंजय शेळके, धनंजय कवळे, सतीष कापरे, अविनाश कवळे यांच्या वाहनावर कार्यवाही करण्यात आली. दुपारी 12 चे सुमारास केलेल्या या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्दशन मुंढे, तहसिलदार किरण सावंत, पोलीस निरीक्षक वसंत भोये, पोलीस उप निरीक्षक शहादेव पालवे, सहा.पो.नि. गौतम फुंदे, हे. काँ. सुरेश बाबर, पो. काँ. बबन दहीफळे, मच्छींद्र जाधव, इरफान शेख, शेखर डोमाळे, आप्पासाहेब कोळेकर, अनवर पठाण, जितेंद्र सरोदे, नागलवाडीचे तलाठी डी. एस. बिरूटे, व्ही. व्ही. चौघुले, एन.व्ही साळुखे, आदी या संयुक्त पथकात सहभागी झाले होते.