सोशल मिडीया महामित्र नोंदणी सुरु
पालघर, दि. 03, फेब्रुवारी - आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनाचा विधायक उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना अधिकाधिक वाव देऊन समाज अधिक विवेकी व्हावा यासाठी सोशल मिडिया महामित्र हा उपक्रम राबविण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे.
या उपक्रमात प्रारंभी प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) प्रत्येकी 10 सोशल मिडिया महामित्र निवडले जातील. या 10 जणांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या महामित्रांची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या समवेत समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चा आयोजित करण्यात येणार आहे. या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी एका महामित्राची राज्यस्तरावर होणार्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येईल. जिल्हास्तरावरील कार्यक्रम सर्वसाधारणत: 5 ते 17 मार्च या कालावधीत होईल.
मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणार्या राज्य स्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी असलेले विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांना आमंत्रित करण्यात येईल. या कार्यक्रमात सोशल मिडिया महामित्र पुरस्कार देण्यात येईल तसेच या सर्वांच्या उपस्थितीत मान्यवरांशी संवाद आयोजित करण्यात येईल. महाविद्यालयातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह यांनी केले आहे.