पुणे, दि. 03, फेब्रुवारी - पर्यावरणाचे जतन करीत त्याचे महत्त्व छायाचित्रांच्या माध्यमातून पटवून देण्यासाठी इकोफोक्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळतर्फे फोटोथॉन 2018 ही छायाचित्रण स्पर्धा पुण्यात होणार आहे. नेमून दिलेल्या अवघ्या 24 तासाच्या वेळेत लाईव्ह छायाचित्र काढून स्पर्धकांना स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे. शनिवारी (दि. 10) घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक सभागृहात स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. मुंबईनंतर पुण्यात दुस-या वर्षी ही स्पर्धा होत असून याद्वारे पर्यावरण जनजागृतीचा प्रयत्न आहे, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक परेश पिंपळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पर्यावरणाचे महत्त्व सांगणारी फोटोथॉन 2018 छायाचित्रण स्पर्धा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:30
Rating: 5