Breaking News

वनकुटे शाळेत माजी विद्यार्थी गुरुजन मेळावा संपन्न


पारनेर/प्रतिनिधी /- वनकुटे जिल्हा परिषद शाळा व सर्व क्लास शाळा वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी मेळावा तसेच माजी गुरूजन ऋणनिर्देश व पारितोषिक वितरण मोठया उत्साहात वनकुटे येथे रविवार, दि.२४/०२/२०१८ रोजी संपन्न झाला.

सर्व माजी गुरूजनांचा सत्कार करण्यात आला. गुरुजनांचा आगळा वेगळा ऋणनिर्देश सोहळा हा दैदिप्यमान असा होता. माजी गुरुजनांचा सत्कार स्वतः त्याना देखील खुप आनंद देऊन गेला.

रत्नागिरी जिल्हा पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे म्हणाले की, खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण गुणवत्ता पूर्ण आहे. ग्रामीण भागात विदयार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देतानाच ई-लर्निगं व डिजिटल वापर अधिक करावा. तरच स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील मुले टिकु शकतात. तसेच वनकुटे शाळेसाठी सर्व गावकऱ्यानीं दातृत्वाच्या भावनेतून मदत करावी.असे आवाहन देखील करण्यात आले.