Breaking News

बेटी बचाओ च्या नावाने होणार्या फसवणूकीला बळी पडू नका - श्‍वेताताई महाले पाटील यांचे आवाहन

चिखली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील मुलींचा घटता जन्मदर वाढावा यासाठी जोरदार प्रयत्न हाती घेतले आहेत. जनतेमध्ये या विषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी सरकार सर्व स्तरांवर प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांमुळे घराघरातून मुलीच्या जन्माचे स्वागत होत आहे. एकूणच देशाच्या समतोल विकासात जनतेची साथ मोदी सरकारला लाभतांना दिसते. परंतु, नेमके याच गोष्टीचा गैरफायदा काही असामाजिक तत्व घेत आहेत असून त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या नावाने केंद्र सरकारने कुठलीही ठेव योजना सुरू केली नसून अश्या कोणत्याही अपप्रचाराला नागरिकांनी बळी पडून अर्ज भरू नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले पाटील यांनी केले आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ च्या नावाने फसव्या योजनेसाठी आपल्या महत्वाच्या कागदपत्रांच्या प्रती घेऊ न संबंधीत लोक भविष्यात आपली फसवणूक देखील करु शकतात असा इशारा श्रीमती महाले यांनी नागरिकांना दिला आहे.


अशी आहे कन्या माझी भाग्यश्री योजनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची घोषणा केली. स्त्री भ्रूणहत्येला आळा बसून मुलींचा जन्मदर वाढावा , त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हे अभियान केंद्र सरकार राबवित आहे. या अभियाना अंतर्गत ’ माझी कन्या भाग्यश्री ( सुधारीत ) ही ठेव योजना सुरू करण्यात आल्याची माहिती श्‍वेताताई महाले पाटील यांनी दिली आहे. ज्या कुटूंबांना 1 आँगस्ट 2017 पूर्वी पहिली मुलगी आहे व 1 आँगसँट 2017 नंतर दुसरी मुलगी जन्मली आहे अश्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना असून त्या मुलीच्या जन्मानंतर मातेने किंवा पित्याने कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असल्यास या योजनेसाठी अर्ज सादर करता येतो. अश्या मुलीच्या नावे 50 हजार रुपयांची ठेव बँकेत ठेवली जाते. मुलीच्या वयानूससार निर्धारीत व्याजदराने मुलीला या योजनेचा परतावा देण्यात येतो. दुसर्या मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणार्यांसाठी सुध्दा दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी 25 हजार या प्रमाणे 50 हजार रुपये मुदती ठेवीच्या स्वरुपात ठेवले जातात व याच प्रमाणे लाभ दिला जातो. अधिक माहितीसाठी तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकार्यांशी संपर्क साधावा असे आवाहन श्रीमती महाले यांनी केले आहे. आज पर्यंत लाखो कुटूंबांनी या योजनेचा लाभ घेतला असून याच लोकप्रियतेचा गैरफायदा काही असामाजिक तत्व घेत असून मुळ योजनेमध्ये अवास्तव बदल करून लोकांची दिशाभूल करीत असल्याची अनेक उदाहरणे समोर आल्याचे श्‍वेताताई महाले यांच्या निदर्शनास आले. 


जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला - श्‍वेताताई महालेमोदी सरकारचे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान देशभरातील मुलींच्या उन्नतीसाठी हाती घेतले. जागतिक महासत्ता बनण्यासाठी वाटचाल करणार्या भारतातील ऊगवत्या पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या अभियानाची संकल्पना प्रभावीपणे राबवित असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील महाराष्ट्रात हे अभियान यशस्वी करीत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थांना लाभत असल्याचे श्‍वेताताई महाले पाटील यांनी स्पष्ट केले. याचाच परिणाम म्हणून मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. हे अभियान सुरु होण्यापूर्वी सन 2014 मध्ये जिल्ह्यात मुलींचा जन्मदर 915 होता. केंद्र व राज्य सरकार आणि जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून या दरात गेल्या 4 वर्षात वाढ झाली असून डिसेंबर 2017 अखेर मुलींच्या जन्मदराचे प्रमाण 921 वर पोहचल्याचा दावा श्रीमती महाले यांनी केला आहे.