वीज उपकेंद्राच्या खाजगी सुरक्षा रक्षकांचा 6 फेब्रुवारीला आत्मदहणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य विद्युत वितरण कंपनीतील खाजगी सुरक्षारक्षक तीन ते चार वर्षापासून अल्पवेतनावर काम करीत असताना त्यांना कायमस्वरुपी सेवेत समावून घेण्याची मागणी नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील वीज उपकेंद्राच्या खाजगी सुरक्षा रक्षकांनी केली. या मागणीसाठी खाजगी सुरक्षा रक्षकांनी महावितरण अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर दि.6 फेब्रुवारीला आत्मदहण करण्याचा इशारा दिला आहे.
कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक एजन्सीमार्फत वीज उपकेंद्रात तीन ते चार वर्षापासून अल्प वेतनावर काम करीत आहे. त्यांच्या कायमस्वरूपी नोकरीचा विचार अधिक्षक अभियंत्यांनी केला नसून, त्यांच्यावर दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. या कंत्राटी कामगारांना कायम न केल्यास त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. अधिक्षक अभियंतांना याबाबत पूर्व कल्पना देऊनही योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली नाही. शासन निर्णयानुसार सुरक्षारक्षकांची सुरक्षा मंडळाकडे नोंदणी होणे आवश्यक होती. याबाबत सरकारचे परिपत्रक देखील आहे. मात्र महावितरणने केवळ आस्थापना नोंदणी केली आहे. कंत्राटी पध्दतीने सुरक्षा रक्षकांकडून काम करुन घेतल्यास भविष्यात ते बेरोजगार होण्याची शक्यता आहे. यासाठी कुठलीही दक्षता महावितरणने घेतली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सरकारच्या निर्णयानुसार खाजगी सुरक्षा रक्षकांची नोंदणी न झाल्यास कामगार महावितरण अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर आत्मदहण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन कामगार मंत्री, ऊर्जा मंत्री, जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात आले असून, या निवेदनावर गणेश बोरुडे, कृष्णा साठे, मोसिन कादरी, अशोक भडके, संदीप जेथे, योगेश कापसे, ज्ञानेश्वर जाधव आदिंसह बत्तीस कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.