‘सोशल मीडिया महामित्र’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत दहा हजार समाजमाध्यमकारांचा सहभाग
आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना अधिकाधिक वाव देऊन समाज अधिक विवेकी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत असून, केवळ तीन दिवसात दहा हजार समाजमाध्यमकारांनी सहभाग नोंदवला आहे.
देशातील बहुतांश तरुण फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत असतात. ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. विधायक संदेशाची देवाण-घेवाण होत असेल तर विवेकी समाज तयार होतो हे सूत्र लक्षात घेऊन सकारात्मक बाबींसाठी समाजमाध्यमांचा प्रभावीपणे उपयोग करणाऱ्या समाजमाध्यमकारांचा गौरव करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसाधारपणे प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे त्या भागातील प्रभावी समाजमाध्यमकारांची विविध निकषांच्या आधारे निवड करून त्यांना मा. मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील मिळणार आहे.