एमपीएससी राज्यसेवेसह अन्य पदांची संख्या वाढवा; निवेदन सादर
राज्य शासनाची लाखो पदे रिक्त असताना शासनाच्या जाहिरातीत मोजकीच पदे भरण्यात येत आहेत. अनेक शासकीय विभागांमध्ये मागील तीन वर्षांपासून भरतीच निघाली नाही. जवळपास सहा लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना फक्त 79 पदांची भरती काढण्यात आली आहे. यामुळे ठराविक अॅकडमी, मार्गदर्शन केंद्र चालवणार्या लोकांना याचा फायदा होणार आहे. अशी माहिती या निवेदनात देण्यात आली. मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेची जागा काढाव्यात, तसेच संयुक्त परीक्षा पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, दुय्यम निबंधक, राज्य उत्पादन शुल्क गट-क या परीक्षा स्वतंत्र घेण्यात याव्यात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेऊन परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसवावेत. उत्तर पत्रिकांसाठी बारकोड पद्धतीचा वापर करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.