Breaking News

दौंडमध्ये लोखंड वितळविण्याच्या भट्टीचा भीषण स्फोट; 6 कामगार गंभीर जखमी


पुणे, दि. 01, फेब्रुवारी - दौंड तालुक्यातील भांडगाव येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असणा-या लोखंडी वस्तू तयार करणा-या मीनाक्षी कंपनीत लोखंड वितळविण्याच्या भट्टीचा भीषण स्फोट झाला. यात 6 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (बुधवार) सकाळी घडली. तीन कामगार 90 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भांडगाव येथील मिनाक्षी फेरो कंपनीत सकाळी भीषण स्फोट झाला. त्यात जवळपास 6 कामगार गंभीर जखमी झालयाची प्राथमिक माहिती मिळली आहे. पुणे-सोलापूर महामार्गापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर भांडगाव- खोर रस्त्यालगत ही कंपनी आहे. कंपनीत भंगार लोखंड वितळवून पक्के लोखंड तयार करण्यासाठी कच्चा माल बनविण्याचे काम केले जाते. या कंपनीत परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे.मीनाक्षी कंपनीतील स्फोट भीषण आहे. कंपनीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परिणामी कंपनी आणखी स्फोट होण्याची शक्यता असल्याने भांडगावमधील नागरिकांमध्ये भिती पसरली आहे.