Breaking News

सानपाडा येथील भूखंड परत करण्याचे सिडकोचे छगन भुजबळांना आदेश

मुंबई, दि. 01, फेब्रुवारी - नवी मुंबईतील सानपाडा येथे एमईटी साठी घेतलेला भूखंड परत करण्याचे आदेश सिडकोने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिले आहेत. 2003 मध्ये महाविद्यालय बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये किंमतीचा हा भूखंड कवडीमोल भावाने विकत घेतला होता. मात्र 2003 ते 2018 या कालावधीत तेथे कोणतेच बांधकाम केले नाही. भूखंड खरेदीनंतर दोन वर्षांत बांधकाम सुरू करणे बंधनकारक असतानाही 15 वर्षांत तेथे कोणतेही काम झाले नाही.


दरम्यान बांधकामासाठी पुरेसा निधी नसल्याचे कारण सांगत भुजबळ कुटुंबीय सिडकोवर दबाव टाकत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. गेल्या 15 वर्षांत संस्थेकडे कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे पुरावे दमानिया यांनी कारवाई करण्याची मागणी सिडकोकडे पत्रव्यवहाराद्वारे केला होता.