Breaking News

74 लाख रुपये घेऊन व्हॅन चालक फरार

पुणे, दि. 01, फेब्रुवारी - एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले 74 लाख रुपये घेऊन व्हॅन चालक व्हॅनसह फरार झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी दोनच्या सुमारास ऍक्सिस बँकेच्या कोकणे चौकातील शाखेमध्ये घडली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेमध्ये असलेल्या एटीएममध्ये भरण्यासाठी 74 लाखांची रोकड घेऊन व्हॅन आली होती. यावेळी गाडीतील सुरक्षारक्षक खाली उतरताच व्हॅन चालकाने व्हॅनसहित 74 लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. घटनास्थळी वाकड व सांगवी पोलीस दाखल झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्हीची तुपासणी सुरु आहे.

अशीच घटना 30 सप्टेंबर 2017 रोजी हडपसर येथे घडली होती. यामध्ये आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या एटीएम कॅश व्हॅनच्या चालकाने सुमारे चार कोटी रुपये व्हॅनसह पळवले होते. हा आरोपी पुढे काहीच दिवसात पोलिसांनी गजाआड केला होता.