Breaking News

सावंतवाडीत 6 व 7 फेब्रुवारीला चाचा नेहरु बाल महोत्सव


सिंधुदुर्गनगरी, दि. 02, फेब्रुवारी - जिल्ह्यातील मुले व प्राधान्याने बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/ स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मागी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकाविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरावर 6 ते 7 फेब्रुवारी 2018 या कालावधीत महिला व बालविकास विभाग सिंधुदुर्ग व महिला व बालकल्याण समिती, नगरपरिषद सावंतवाडी यांचे संयुक्त विद्यमाने 6 फेब्रुवारी 2018 रोजी जिमखाना मैदान सावंतवाडी व 7 फेब्रुवारी 2018 रोजी बॅ. नाथ पै. सभागृह, सावंतवाडी येथे चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
6 फेब्रुवारी 2018 सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजता सांघीक स्पर्धा- खो-खो, कबड्डी, लांब उडी, गोळा फेक लहान गट/ मोठा गट. दुपारी 1.30 ते दुपारी 2.30 वाजता जेवण. दुपारी 3 ते सायंकाळी 5.30 वाजता उर्वरित सांघीक स्पर्धा लहान गट/ मोठा गट. दिनांक 7 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजता बुध्दिबळ, कॅरम, चित्रकला, समुहनृत्य, लहान गट/ मोठा गट. दुपारी 1.30 ते 2.30 जेवण. दुपारी 3 वाजता पारितोषिक वितरण सोहळा आणि समारोप.