Breaking News

फटाके कारखान्यातील स्फोटात एक ठार


कोल्हापूर : कोल्हापुरातील पेठ वडगावमधील भादोले रोडवरील चिखलगार फटाके कारखान्यात स्फोट होऊन एक जण ठार झाला आहे. तर, या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. प्रकाश शिवराम सावंत असे मृताचे नाव असून शिवाजी दबडे हे जखमी झाले आहेत. अमित चिखलगार यांच्या फटाक्याच्या कारखान्यात हा स्फोट झाला आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. कारखान्यामध्ये कामगार वातीला कागद लावण्याचे काम करत असताना हा स्फोट झाला. यामध्ये प्रकाश हे जागीच ठार झाले तर शिवाजी हे 90 टक्के भाजले. त्यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणली.