विदर्भात आतापासूनच पाणीटचांईचे चटके धरणांमध्ये केवळ 28 टक्केच पाणीसाठा शिल्लक
नागपूर : उन्ह्याळ्याची चाहुल लागली असतांनाच विदर्भात वाढत्या उन्हासोबत पाणीटंचाईचे चटके बसायला सुरवात झाली. विदर्भातील धरणांमध्ये सध्या फक्त 28 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाण्यावर आणखी चार महिने माणसांची तहान भागवायची आहे. त्याचबरोबर जनावरासाठीही पाणी राखून ठेवण्याचे आव्हान प्रशासनाला स्वीकारावे लागणार आहे.
गेल्यावर्षीच्या मान्सूनमध्ये हवा तसा पाऊस झाला नाही. त्यातच शेतकर्यांनी या रब्बी हंगामात पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने धरणातील साठा कमी झाला आहे. विदर्भातील लघू, मध्यम आणि मोठ्या अशा 828 धरणांमध्ये सध्या फक्त साधारण 28 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे अशी माहिती नागपूर सिंचन विभागाचे कार्यकारी अ भियंता व्ही.व्ही. गावंडे यांनी दिली. उन्हाळ्याच्या 3 महिन्यात मोठ्याप्रमाणात बाष्पीभवन झाल्यामुळे धरणातील पाणीपातळीत घट होते. ही सर्व स्थिती लक्षात घेऊन झाडांसाठी, कुलर्ससाठी किंवा गाड्या धुण्यासाठी पिण्याचे पाणी न वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भात आतापासून पाण्याचे चटके बसायला सुरूवात झाली आहे.