Breaking News

डीएसकेंच्या पोलीस कोठडीत 1 मार्चपर्यंत वाढ


पुणे : डी. एस. कुलकर्णी यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. पोलीस कोठडीचा आजचा शेवटचा दिवस होता. सर्व वैद्यकीय चाचण्या सामान्य असल्याचे ससून रुग्णालयाचे डीन चंदनवाले यांनी सांगितल्यानंतर डीएसकेंना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आज डीएसकेच्या पोलीस कोठडीत 1 मार्चपर्यंत वाढ केली. गुंतवणूकदारांचे पैसे बुडवल्याप्रकरणी डीएसके दाम्पत्याला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसकेंनी मुदतही वाढवून घेतली होती. मात्र, मुदत संपल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार डीएसकेंना अटक करण्यात आली होती.