Breaking News

दहावी-बारावीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 24 हजार 52 परिक्षार्थी

सिंधुदुर्गनगरी,  दहावी आणि बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 24 मार्च या कालावधीत होणार आहे. यामध्ये दहावीसाठी 12 हजार 286 आणि बारावीसाठी 11 हजार 766 विद्यार्थी असे एकूण 24 हजार 52 विद्यार्थी यावर्षी परीक्षा देणार आहेत.
 
1 मार्च ते 24 मार्च या कालावधीत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावीची परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील 219 माध्यमिक शाळांमधील 12 हजार 286 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये 6 हजार 497 मुलगे तर 5 हजार 789 मुलींचा समावेश आहे. 41 परीक्षा केंद्रावरून ही परीक्षा घेतली जाणार आहे.
दहावी आणि बारावी म्हणजे विद्यार्थी जीवनातील अतिशय महत्वाचा टप्पा. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. जिल्ह्यातील 79 कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेतून 1 हजार 468 मुलगे आणि 1 हजार 411 मुली असे 2 हजार 879 विद्यार्थी समाविष्ट आहेत. कला शाखेतील 1 हजार 520 मुलगे तर 1 हजार 372 मुली असे एकूण 2 हजार 892 आणि वाणिज्य शाखेतील 2 हजार 220 मुलगे, 2 हजार 706 मुली असे एकू ण 4 हजार 926 विद्यार्थी तर एमसीव्हीसीचे 781 मुलगे, 288 मुली असे एकूण 1 हजार 69 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. त्यामुळे यावर्षी बारावीच्या परीक्षेला 5 हजार 989 मुलगे, 5 हजार 777 मुली असे एकूण 11 हजार 766 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. 23 केंद्रांवरून 19 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. 
कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा सुरळीत पार पडाव्यात, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. कॉपीसारखा गैरप्रकार रोखण्यासाठी पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.