Breaking News

वेरळ ग्राम पंचायतीवर शिवसेनेचा भगवा

मालवण तालुक्यातल्या वेरळ ग्राम पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ग्राम पंचायतीच्या सरपंच-उपसरपंच यांच्या सह पाच सदस्यांनी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष वेरळ ग्राम पंचायतीवर असलेली काँग्रेस तथा राणे समर्थकांची सत्ता संपुष्टात आली आहे.


वेरळ ग्रा.प. वर गाव विकास पनेलच्या सरपंच आनंदी आबा परब, उप सरपंच आणि सदस्य यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एक हाती सत्ता प्रस्थापित केली होती. या पनेलचे प्रमुख आबा दामोदर परब यांनी शिवसेना पक्षावर विश्‍वास दाखवून संपूर्ण ग्रां.प.चा खासदार विनायक राउत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नुकताच जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांची असलेली वेरळ ग्रा.प. वरील काँग्रेस तथा राणे समर्थकांची सत्ता संपुष्टात येतून या ग्रा.प. वर अखेरे शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
वार्षिक जात्रोत्सवाचे औचित्य साधून वेरळ ग्रा.प.चे सरपंच सनदी आबा परब, उप सरपंच शंकर दत्ताराम चव्हाण आणि सदस्य भगवान धाकू परब, निकिता नारयण पोयरेकर, सोनाली धाकू खरात, सुविधा सुरेश मापारी, रंजना रामचंद्र तांबे या पाचही सदस्यांनी खासदार विनायक राउत आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. खासदार राउत आणि आमदार नाईक यांनी भगवी शाल आणि शिवबंधन त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला.