तेलाच्या जहाजासह 22 भारतीय खलाशी बेपत्ता जहाजात 13,500 टन पेट्रोल; अपहरण झाल्याची शक्यता
नवी दिल्ली : पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीवर तेल टँकर असलेले जहाज गायब झाले असून, त्यामध्ये 22 भारतीय खलाशांचा समावेश असल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या 48 तासांपासून ही जहाज समुद्रातून गायब झाली आहे. त्यामुळे या जहाजेचे अपहरण झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पनामावर नोंदणी झालेल्या या जहाजात 13,500 टन पेट्रोल असून, त्यांची किंमत 8.1 दशलक्ष इतकी आहे. गायब झालेले जहाज मुंबईतील अँग्लो ईस्टर्न शिपिंग कंपनीच्या मालकीचे आहे अशीही माहिती समोर येते आहे. या कंपनीने जहाजाचा शोध घेण्यासाठी शिपिंग डायरेक्टरेट जनरल यांची मदत मागितल्याचे समजते आहे. हे एक व्यापारी जहाज आहे. या जहाजाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे.
या टँकर कंपनीच्या सांगण्यानुसार गुरुवारी रात्री 5:30 वाजल्यापासून या जहाजाशी संपर्क होतं नाही. जानेवारी महिन्यातही एक अशीच घटना घडली होती. ज्यात एमटी बॅरेट नावाच्या जहाजाचे बेनिन किनार्यावरुन अपहरण करण्यात आले होते. त्यातही अनेक भारतीय खलाशी होते. ज्यांना खंडणी दिल्यानंतर सोडून देण्यात आले. मरीन ट्रॅफिक रेकॉर्डनुसार 180 मीटर लांब असलेला हा तेलाचा टँकर शेवटचा कोटोनाउमध्ये दिसला होता. सर्वेक्षक आणि शिपिंगचे महानिदेशक बीआर शेखर यांच्या सांगण्यानुसार भारताने नायझेरिया आणि बेनिनकडून या जहाजाला शोधण्यासाठी मदत मागितली आहे. पण मागील दोन महिन्यांत दोन जहाजे बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. अँग्लो-इस्टर्न शिप मॅनेजमेंटने जहाज तेल टँकर असलेली जहाज गायब झाल्याचे आणि जानेवरीतही असा प्रकार घडल्याचे ट्विटद्वारे कळवले आहे. यात भारतीय खलाशांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले आहेत. गायब झालेले जहाज पश्चिम अफ्रिकेतील समुद्री चाच्यांनी पळवले असावे अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. ही शक्यता लक्षात घेऊन तपास करण्यात येतो आहे.