Breaking News

रेल्वे विकासासाठी 1 लाख 48 हजार कोटी


रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात 1 लाख 48 हजार कोटी रूपये खर्च करण्यात येणार असून, 4 हजार किलोमीटर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जेटली यांनी यावेळी दिली. तसेच मुंबईत 90 किलोमीटर लांबीच्या रेल्वे रूळांचा विस्तार करण्यात येणार आहेत. देशातील सर्व रेल्वे स्थानके व सर्व रेल्वे गाडयांमध्ये सीसीटीव्ही लावणार असून वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद- मुंबई या मार्गावर होणार आहे. या प्रकल्पासाठी वडोदरा येथे कर्मचा़र्‍यांना प्रशिक्षित करण्याचे काम सुरू आहे. तसेच देशभरात 600 रेल्वे स्थानकांचे आधुनिकिकरण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय रेल्वे स्वरंक्षण कोश या योजनेअंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा अरूण जेटली यांनी यावेळी केली.