Breaking News

विद्यापीठ प्रवेशामध्ये महाराष्ट्र अव्वल; 9 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

मुंबई / नवी दिल्ली, दि. 07, जानेवारी - तंत्रशिक्षण, दूरशिक्षण, शिक्षक प्रशिक्षण व विद्यार्धी प्रवेश आदी विविध क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे चित्र देशपातळीवर केले गेलेल्या उच्च शिक्षण सर्वेक्षणातुन समोर आले आहे. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने उच्च शिक्षणाची देशातील सद्यस्थिती दर्शविणारा 2016-17 चा अहवाल नुकताच प्रसिद्ध के ला आहे. मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन झाले. 


देशात विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. महाराष्ट्रात 9 लाख 40 हजार 480 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली आहे, तामिळनाडू 8 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसह दुसर्‍या तर दिल्ली 7 लाखाहून अधिक विद्यार्थी प्रवेशासह तिसर्‍या स्थानावर आहे.