Breaking News

पुण्यात पाणीपुरवठा लाभ करात दुप्पट वाढ

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पाणीपट्टीत पाच टक्के दरवाढ क रण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयापाठोपाठ आता पाणीपुरवठा लाभ करामध्येही दुपटीने वाढ करण्यात आली आहे. पाणीपुरवठा लाभ करात वाढ केल्यास वार्षिक सुमारे 30 कोटी रुपयांचे उत्पन्न वाढेल, असा अंदाज आहे. 

या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. अमृत योजनेअंतर्गत शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून 300 एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी सिंचन पुनर्स्थापना खर्च 236 कोटी तसेच पुनर्वसन खर्च 70 कोटी रूपये सरकारक डे जमा करण्यात येणार आहे. या दोन्ही धरणातील पाणी चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 500 कोटी रू पये इतका खर्च येणार आहे. त्यामुळे महापालिकेवर भविष्यात 806 कोटीचा बोजा पडणार आहे. महापालिकेवर पडणारा हा बोजा काही प्रमाणात भरून येण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा लाभ करामध्ये दुपटीने वाढ करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार, शहराला पाणीपुरवठा करण्याची तरतूद करण्यासाठी महापालिकेस वाजवी वाटेल अशा त्यांच्या करयोग्य मूल्याच्या टक्केवारीने पाणीपट्टी आकारण्याची तरतूद आहे. महापालिकेतर्फे पाणीपुरवठा लाभ करापोटी आकारण्यात येणारे सन 2017-18 चे निवासी दर करयोग्य मूल्यावर चार टक्के आहेत. ते आठ टक्के होणार आहेत. तर व्यावसायिक दर करयोग्य मूल्यावर पाच टक्के आहेत. ते दहा टक्के होणार आहेत. पाणीपुरवठा लाभकरापोटी महापालिकेला दरवर्षी सुमारे 30 कोटी रूपये उत्पन्न मिळते. लाभ कर दुप्पट करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नात 30 कोटींनी वाढ होणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने पंधरा दिवसांपुर्वी पाणीपट्टीत पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पाणीपुरवठा लाभ करामध्येही दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे.

पालिका 209 किमी अंतराची ड्रेनेज लाईन टाकणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय नागरी सुधारणा अभियान (अमृत) अंतर्गत मल निस्सारण वाहिनी (ड्रेनेज लाईन) व मैला-सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्पाचे (एसटीपी प्लॅन्ट) काम करण्यात येणार आहेत. यामध्ये दापोडी ते निगडी या मार्गावरील जुनी ड्रेनेज लाईन क ाढून तब्बल 209 किलोमीटर अंतरावर नवी लाईन टाकण्यात येणार आहेत. तसेच, बोपखेल, चिखली व पिंपळे निलख येथे तीन नवे एसटीपी प्लॅन्ट बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या 156 कोटी खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.


अमृत अभियानातील या कामासाठी येणा-या 147 कोटी 84 लाख रूपयांचा निधीस राज्य सरकारने 12 ऑक्टोबर 2017 ला मान्यता दिली आहे. या योजनेसाठी केंद्राकडून 33 टक्के व राज्य शासनाकडून 16.67 टक्के अनुदान निधी मिळतो. उर्वरित 50 टक्के निधी व वाढीव निधी पिंपरी-चिंचवड महापालिकेस करावा लागणार आहे. त्या अंतर्गत केंद्राकडून 49.31 कोटी, राज्याकडून 24.62 कोटी आणि महापालिकेचा हिस्सा 73.92 कोटी रूपये इतका असणार आहे.