Breaking News

विद्यार्थी सत्काराबरोबरच मान्यवरांच्या गुणगौरवाने भारावले जामखेडकर


जामखेड/ ता.प्रतिनिधी/ - जामखेड येथे मॅथवर्ड क्लासच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थी सत्काराबरोबरच विशेष मान्यवरांचा गुणगौरव व सत्कार समारंभ लोकमान्य वाचनालय येथे उत्साहात संपन्न झाला मॅथवर्ड क्लासचे संचालक धनंजय भोसले यांच्या वतीने क्लास चालवण्या बरोबरच विद्यार्थी घडवून त्यांच्या पुढील आयुष्यात उपयोगी येतील असे सामाजिक व संस्कार क्षम उपक्रम सतत राबविले जातात. तसेच सामाजिक जाण ठेवून समाजहिताच्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांने करून समाजापुढे वेगवेगळा आदर्श निर्माण केला पाहिजे. असे सातत्याने विचारात ठेऊन ते नवनवीन उपक्रम राबवत असतात. त्याच प्रमाणे 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जामखेड येथील लोकमान्य वाचनालयात सन 2018 चा क्लासच्या विद्यार्थी चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व जामखेड व परिसरातील विशेष व्यक्तींचा सत्कार समारंभ घेण्यात आला. 

विश्वदर्शन केबल संचालक गुलाब जांभळे यांना शिवरत्न हा मोलाचा पुरस्कार 1 जानेवारी रोजी रायगडावर मिळाला. सारोळा गावचे संरपच अजय दादा काशीद यांची जिल्हा संरपच अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सारोळा येथील सुपुत्र व उद्योगपती रमेश आजबे यांना उत्कृष्ट उद्योजक चा युरोप मध्ये मिळालेल्या पुरस्काराबद्दल, तर पिंपळगाव आळवा येथील मुख्याध्यापक निंबाळकर यांना आदर्श शिक्षक हा जिल्हा परिषद चा पुरस्कार मिळाल्याबद्दल वरील मान्यवरांचा सत्कार व गुणगौरव मॅथवर्ड क्लासच्या वतीने करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट प्रगती, स्पर्धा परिक्षा बद्दल नैपुण्य मिळवणाऱ्या क्लास मधील विद्यार्थी व विद्यार्थीनी चा सत्कार व गुणगौरव करण्यात आला.या प्रसंगी मॅथवर्ड चे संचालक धनंजय भोसले यांच्या आई व बंधू यांचा भोसले सह विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी क्लासचे शिक्षक विद्यार्थी पालक नगराध्यक्ष अर्चना राळेभात, उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, नगरसेवीका राजश्री ओव्हाळ, नगरसेवक बिभीषण धनवडे, बार असोशियेशन चे अध्यक्ष हर्षल डोके, सागर पवार, किरण रेडे, सह पालक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन शालेय विद्यार्थीने केले तर आभार धनंजय भोसले यांनी मानले.