Breaking News

प्रोत्साहन अनुदानापासून पाडळीतील शेतकरी वंचित.


पारनेर/प्रतिनिधि/- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. मात्र प्रोत्साहन अनुदान मिळणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी राहिल्या असून, त्या दुरुस्त करण्यासाठी किती दिवस लागणार? याबाबतची माहिती कोणाकडेही उपलब्ध नाही. यामुळे पाडळी रांजणगाव येथील नियमीत शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असल्याचे वास्तव समोर आले आहे.
विकास सोसायटीचे कर्ज जून नंतर भरल्यास वर्षभराचे व्याज आकारण्यात येते. त्यामुळे अनेक शेतकरी उसनवारी करून वेळेत कर्ज भरतात. कर्ज नियमित आणि वेळेत भरणार्‍या शेतकरी सरासरी ७०% टक्के आहेत. उर्वरित शेतकरी थकबाकीदार असतात. 

कर्जमाफीची घोषणा झाल्याने अनेक शेतकर्‍यांनी मार्च व जून अखेरन पर्यंत कर्ज भरले नाही. त्यामुळे अनेक नियमित कर्ज भरणारे शेतकरी थकबाकीदार झाले. वेळेत कर्ज भरले नाही म्हणून त्यांच्या कर्जावर वर्षभराचे व्याज आकारण्यात येत आहे . शासनाने ३० जून २०१६ अखेर कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी केली. मात्र २०१६ नंतर कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना दीड लाखाच्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नसल्याने ही कर्ज माफी फसवी असल्याची भावना पाडळीचे सरपंच डी. बी. करंजुले व सेवा सोसायटी चेअरमन किरण साठे यांनी व्यक्त केली.