Breaking News

पारायण सोहळ्यास प्रारंभ


सोनई/ प्रतिनिधी -सिद्धेशवर श्री संत गुलाबाबाबा यांच्या फिरता पारायण सोहळा आज दि, २३ रोजी(मंगळवार) सोनई-बेलेकरवाडी रोड आण्णासाहेब आदमाने यांच्या वस्तीवर सुरु होणार आहे,२३ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत काकडा भजन, सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत संत गुलाबाबाबा ग्रंथ पारायण वाचन, दुपारी ४ वाजल्यापासून ते ५ वाजल्यापर्यंत प्रवचन, सांयकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत हरीपाठ व रात्री ८ ते १० वाजेपर्यंत किर्तन या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून ध्वजारोहण मा,आ,शंकरराव गडाख व व्यापारी सुदामराव तागड यांच्या हस्ते होणार आहे, तरी परिसरातील भाविकांनी या पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आदमाने परिवार व गुलाबाबाबा भक्त यांनी केले आहे,या कार्यक्रमात ह. भ. प. कारभारी महाराज पंडित, ह. भ.प. गजानन भाऊ उमक, ह.भ.प. शांताराम महाराज,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज(रेणुकामाता दरबार), उपस्थित राहणार असून 30 जानेवारी रोजी ह.भ.प. केशव महाराज चावरे यांचे सकाळी 9 ते 11या वेळेत काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने सांगता होणार आहे.