‘स्मृती सेवारती’ पुरस्कार गौतम पवार यांना जाहीर
सांगली, दि. 20, जानेवारी - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी दिल्या जाणा-या यंदाच्या ‘स्मृती सेवारती’ पुरस्काराने नवभारत शिक्षण मंडळ व शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे संचालक गौतम पवार यांना शनिवार 20 जानेवारी रोजी सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर स्मृती प्रतिष्ठानचे विश्वस्त महेश कराडकर व राजेश कराडकर यांनी दिली.
स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्योत्तर कालावधीत कामगार चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती आंदोलन यात नामदेवराव कराडकर यांनी धडाडीने काम केले होते. याशिवाय सहकार, शिक्षण, पत्रकारिता, आयुर्वेद व अध्यात्म अशा विविधांगी क्षेत्रात तळमळीने कार्यरत राहिलेले नामदेवराव कराडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजासाठी प्रामाणिकपणे अव्याहत कार्यरत असणा-या युवा कार्यकर्त्याला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. गतवर्षी हा पुरस्कार रूग्णसेवा, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील कामगिरीबाबत डॉ. दिलीप शिंदे यांना प्रदान करण्यात आला होता.
यंदाचा हा पुरस्कार शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात राज्यस्तरावर भरीव कामगिरी करणार्या गौतम पाटील यांनी जाहीर करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत गौतम पाटील यांनी आपली वाटचाल ठेवली आहे. नवभारत शिक्षण मंडळाचे उपसंचालक व आता संचालक म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी या संस्थेच्या यशाची पताका देशभर उंचावली आहे. आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारताना त्यांनी आपली परंपरा व लोककला जपण्याचे खूप महत्त्वपूर्ण काम केले आहे. महाराष्ट्र राज्य जिम्न ॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही सध्या ते धडाडीने काम करीत आहेत. याशिवाय धनुर्विद्या, रायङ्गल शुटिंग, ज्युडो, हॉर्स रायडिंग व अनेक मैदानी खेळात अनेक खेळाडू केवळ गौतम पाटील यांच्या पाठबळामुळेच राज्यस्तरावर मोलाची कामगिरी करीत आहेत.