नाशिक, दि. 20, जानेवारी - सटाणा तालुक्यातील निकवेल येथील कृष्णा भावराव वाघ (वय 43) या अल्पभुधारक शेतकर्याने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे 2 लाख 85 हजार रुपये, गिरणा सहकारी बँकेचे 1 लाख रुपये असे 3 लाख 85 हजार रुपये आणि त्यावरील व्याज 1 लाख 80 हजार रुपये असे एकुण 5 लाख 65 हजार रुपये कर्ज होते.वाघ यांची दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. त्यामूळे त्यांच्या शिक्षणाचीही जबाबदारी त्यांच्यावर होती. अचानक वडीलांनी आत्महत्या के ल्यामूळे वाघ कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतीतल्या घटलेल्या उत्पन्नामुळे कर्जाची वेळेत परतफेड कृष्णा वाघ करु शकले नव्हते. शासनाने केलेल्या कर्जमाफीचा लाभदेखील त्यांना झाला नव्हता. त्यामुळे ते नेहमीच आ र्थिक विवंचनेत असायचे.
निकवेल येथे कर्जबाजारी शेतकर्याची आत्महत्या
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:43
Rating: 5