Breaking News

रासपच्या कर्जत तालुका संपर्क प्रमुखपदी भरत लांबोर

राष्ट्रीय समाज पक्षाच्या कर्जत तालुका संपर्क प्रमुखपदी करमनवाडी येथील भरत शहाजी लांबोर यांची निवड झाली. तालुकाध्यक्ष रविंद्र कोठारी यांनी निवडीचे पत्र प्रदान केले. यावेळी रासपचे नेते दादासाहेब केसकर, पशुसंवर्धन समितीचे सदस्य माणिक दागडे, कार्यकारी सदस्य नितिन धायगुडे, रमेश व्हरकटे, संभाजी मेरगळ, महेंद्र कोपनर आदी उपस्थित होते. भरत लांबोर यांनी वयाच्या 22 व्या वर्षी रासपकडुन पंचायत समितीची निवडणूक लढवून 1318 मते मिळविल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते. तालुक्यातील गावागावात पक्षाच्या शाखा सुरु केल्या जातील. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करुन जनतेचे प्रश्‍न सोडविणार आहे. मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाकडुन शेळीपालन, कुक्कुटपालन तसेच मत्सव्यवसाय प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लांबोर म्हणाले.